Regular Programmes

Joyful learning and activity based science

A successful venture that lays the foundation for enjoyable science education running in three phases, the initiative doubles the joy of science learning.
Creativity leads to depth while learning. The depth of the syllabus solves the concepts. New ideas emerge in students and various experiments transform into projects and replicas. This obsession leads to a scientific approach and begins to take root in science. In this activity students experience science toys, science experiments, replicas and their usefulness for themselves.

अनुभूती – आनंददायी विज्ञानशिक्षणाचा मूलभूत पायाभक्क्कम करणारा यशस्वी उपक्रम तीन टप्प्यांमध्ये चालणारा हा उपक्रम विज्ञान शिक्षा आनंद द्विगुणित करतो . शिकताना कृतिशीलता सखोलतेकडे घेऊन जाते . अभयसक्रमातील सखोलता संकल्पनांची उकलकरते. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना उदयास येतातआणि निरनिराळ्या प्रयोगांचे रूपांतर प्रकल्पांमध्येआणि प्रतिकृतीमध्ये होते . हाच ध्यास वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे घेऊन जातोआणिवैज्ञानिकतेची रुजवात सुरु होते .या उपक्रमात विद्यार्थी विज्ञानखेळणी , विज्ञानप्रयोग , प्रतिकृतीआणि त्यांची उपयोगिता स्वतः अनुभवतात .

Science Toys and Its Application

Children need to be allowed to make if we want to develop a passion for science education in them. Children develop through toys. They love moving, sound-making toys. Playing stimulates their development and gives rise to new ideas. From an early age, they are taught to make toys out of many wastes and they get to experience how to add value to each item. This experience definitely teaches you to enjoy the environment and the environment with joy.

 विज्ञानखेळणी आणि त्याची उपयोगिता

विज्ञानशिक्षणाची आवड निर्माण व्हावीअसे वाटतअसेल तर मुलांना खेळणी तयार करायला देणे आवश्यक आहे. लहान मुलांचा विकास खेळण्यांमधून होतो .त्यांना चालणारी, फिरणारी ,आवाज निर्माण करणारी खेळणी आवडतात खेळण्यातून त्यांच्या विकासास चालना मिळते आणि नवनवीन कल्पना उदयास येतात . बालवयातचअनेक टाकाऊ वस्तूपासून खेळण्यांच्या निर्मितीचे संस्कार झाल्या नेत्यांना प्रत्येक वस्तूचे मूल्यवर्धन कसे करायचे याचा अनुभव मिळतो . हा अनुभव निश्चितच आनंदसोबत परिसराला आणि पर्यावरणाला उत्तम राखण्याचे शिक्षण देतो

Science Learning through Simple Experiment

Simple science experiments can bring joy to the average student, parent, and others. Because these experiments can be done from easily available materials. It also help them to understand how they are used in our daily lives. So we can understand how close the truth of science is to us. As each student gets a chance to do thirty different experiments, the students start doing different experiments with curiosity. This initiative can be taken if it is organized by schools, colleges and other social organizations

सोप्याप्रयोगातून विज्ञानशिक्षण

सोप्या विज्ञान प्रयोगातून सर्वसामान्य विद्यार्थ्याला, पालकांना आणि इतरांनाही आनंद मिळू शकतो. कारण हे प्रयोग सहज उपलब्ध साहित्यातून करता येतात . शिवायत्यांचाआपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे ही समजते . त्यामुळे विज्ञानाचे सत्यवास्तव आपल्या किती जवळचे आहे हे समजून घेता येते . तीस निरनिराळे प्रयोग प्रत्येक विद्यार्थ्याला करण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थी कुतूहलाने निरनिराळे प्रयोग करू लागतात. शाळा , महाविद्यालय इतर सामाजिक संस्थांनी आयोजन केल्यास हा उपक्रम घेता येतो .

Solar Energy Equipment Making Workshop

People from all walks of life are given access to this solar equipment manufacturing workshop. The basic and functional course of solar energy emphasizes the importance of solar energy. This course builds confidence that you can build solar equipment. Everyone has the opportunity to create equipment, which gives them the joy and experience of creation as well as the tools they use to create their own. The above course is definitely useful for running your own business.

 परिसरातील सौर उपकरण तयार करण्याची कार्यशाळा

सौर उपकरण तयार करण्याच्या या कार्यशाळेत सर्व स्तरातील इच्छुकांना प्रवेश दिला जातो. सौरऊर्जेचा मूलभूत आणि कृतिशील अभ्यासक्रम सौरऊर्जेच महत्व पटवून देतो. सौरउपकर्ण आपल्याला तयार करण्याची संधी मिळत असल्याने निर्मितीचा आनंद आणि अनुभव मिळतोच त्याचबरोबर तो स्वतःसाठीही उपकरण तयार करून त्यांचा वापर करतो. हा अभ्यासक्रम स्वतःचा व्यवसाय खात्रीशीर चालू करण्यासाठी उपयोगी ठरतो .

Certificate Course in solar And Other Energy Sources

It takes time to study the subject of solar energy. The field of energy is vast and there is a lot of scope especially in a country like India to do the work related to the solar energy. There is a huge opportunity for trained manpower in this field. The course is held on Saturdays and Sundays. Admission is given to Class X pass students.

 सौरऊर्जा आणि इतर ऊर्जा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सौरऊर्जा हा विषय अभ्यासणे ही काळाची गरज आहे ऊर्जेचे क्षेत्रव्यापक असून देशात प्रचंड काम बाकी आहे त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाला या क्षेत्रात मोठी संधी आहे. आपल्या देशात याविषयी खात्रीशीर मनुष्यबळ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्या अभ्यासक्रमाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे या अभ्यासक्रमात मूलभूत ॲडव्हान्स प्रायोगिक आणि व्यावहारिक बाबींचा समावेश असून शनिवार,  रविवार या दिवशी घेण्यात येतो.  या अभ्यासक्रमात इयत्ता दहावी पास विसद्यार्थ्यांना दिला जातो.

Concept Development through Experiment

The study of science can not be completed by simply reading or teaching.  The core of science is experimentation. Experimenting with one’s own hands solves the subject and begins to understand its meaning. Experiencing the results of the experiment closely helps to clarify the concept behind it. For this, four levels have been planned and for each level, ten active classes and 100 experiments have been planned. Admission begins in June, at the beginning of the academic year. 

 प्रयोगाद्वारे संकल्पनांचा विकास

विज्ञानासारखा विषय वाचून किंवा नुसता शिकवून पूर्ण होत नाही. विज्ञानाचा मूळ गाभाम्हणजे प्रयोग. स्वःताच्या हाताने प्रयोगकेल्यास विषयाची उकल होते आणि त्याचा अर्थ कळू लागतो. प्रयोगाचे निष्कर्ष जवळून अनुभवल्याने त्यामागील संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. यासाठी चार स्तरांचे नियोजन केलेअसून प्रत्येक स्तरासाठी दहा कृतिशील वर्गांची आणि  १०० प्रयोगांची आखणी केलेली आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात यासाठी प्रवेश दिला जातो .

Sky Observation

A captivating sight in the darkness of the night is the constellation of stars in the sky. Everyone is curious to see this amazing and enchanting view of nature that keeps human curiosity alive for a long time. In this activity, stars, constellations, planets, and galaxies can be observed through direct telescopes and with the naked eye. Jupiter’s satellites, Saturn’s rings, Akash Ganga, etc. Observing this thing through binoculars gives you immense happiness and an unrestricted experience.

 आकाशदर्शन

रात्रीच्याअंधारात मनोवेधक दृश्य म्हणजे आकाशातील तारेआणि तारकापुंज. मानवाचे कुतूहल दीर्घकाळ टिकवून ठेवणारे हे निसर्गातील अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे विलोभनीय दृश्य पाहण्याचीउत्सुकता सर्वानाच असते. या उपक्रमात तारे ,नक्षत्र , ग्रह आणि आकाशगंगा यांचे प्रत्यक्ष दुर्बिणीतूनआणि उघड्याडोळ्यांनी निरीक्षण करतायेते. गुरुचे  उपग्रह , शनीची कडी, आकाशगंगा, इ. गोष्टी दुर्बिणीतून पाहिल्यास आनंद द्विगुणित तर होतोच पण मुक्त आनंदही मिळतो. हा उपक्रम शाळा, महाविद्यालय, निवासी संकुल, संस्था, इ. मध्ये खुल्या प्रांगणात अथवा गच्चीत घेता येतो . 

Scroll to Top